Share

जन्मभूमी कर्मभूमीत फोफावलेल्या कोरोनाच्या स्थितीवर रामबाण उपाय शोधणार का फडणवीस ?  

Published On: 

नागपूर : महाराष्ट्रात पाहणी दौरे करणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहरात येणार असून, पुढील चार दिवस येथेच तळ ठोकून राहणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी त्यांनी ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा आढावा घेतला होता, आज तब्बल महिनाभरानंतर ते नागपुरात आहेत. कोरोनासोबतच पदवीधर मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाबाबत ते पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे फडणवीसांची जन्मभूमी कर्मभूमीत असलेल्या नागपुरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळॆ पुढील चार दिवसांत रामबाण उपाय शोधण्यात ते यशस्वी होतील का हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरेल.

मागील ऑगस्टमध्ये त्यांनी महापालिकेत शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. त्या बैठकीत त्यांनी सप्टेंबरमध्ये बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचे भाकीत करीत महापालिकेला चाचण्या वाढविण्याची सूचना केली होती. महिनाभराने पुन्हा ते कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. ते चार दिवस शहरात राहणार असल्याचे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. या आढावा बैठकीसोबतच ते येणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातही भाजप पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सूत्राने सांगितले.

प्रा. अनिल सोले यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. यात महापौर संदीप जोशी यांचे नाव आघाडीवर आहे. महापौर संदीप जोशी यांनीही वाढदिवसाला महापालिकेची निवडणूक यापुढे लढणार नसल्याची घोषणा करीत उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यामुळे या निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजपची डागाळलेली प्रतिमा सुधारणार?  ऐन कोरोनाच्या काळात तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदावरून बदली झाल्याने शहरातील बहुसंख्य नागरिक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत. ही नाराजी सोशल मीडियावरून स्पष्टपणे दिसून येत आहे. नेटकरी उघडपणे पदाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत आहेत. या प्रकरणात भाजपची प्रतिमा चांगलीच डागाळली.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!