नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बडे उद्योगपती सार्वजनिक तसेच खाजगी बँकांना फसवून परदेशात पलायन करण्यास यशस्वी झाले आहेत. या बँक फसवणुकीवरून केंद्रातील भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात अनेक आरोप- प्रत्यारोप झाले आहेत आणि होत आहेत.
नुकताच देशात अजून एक बँक घोटाळा समोर आला आहे. यावरून काँग्रेसने केंद्रातील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. एबीजी शिपयार्डच्या (ABG Shipyard) कथित बँक फसवणुकीवरुन काँग्रेसने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर या घोटाळ्यावरून टीका केली आहे. मोदी यांच्याच संमतीने एबीजी शिपयार्डचा 22,884 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1492820754370633730?s=20&t=mqgtb70OsrxoJ_vi0SiRqA
मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतातील जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही, आणि यामुळेच देशातील बँकिंग व्यवस्था डबघाईला आली असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुप मधील बँकांना एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष अगरवाल आणि त्यांच्या साथीदारांनी २२८४२ रुपयांना फसवल्याचा आरोप सध्या होत आहे. आणि या सर्व भ्रष्टाचाराला नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे अशी टीका आज राहुल गांधी यांनी ट्विटर वरून केली.
महत्वाच्या बातम्या :
- इंदापूरच्या विकासावरून दत्तात्रय भरणे यांची हर्षवर्धन पाटलांवर टीका, म्हणाले कि…
- ‘…त्यामुळेच ते अशाप्रकारचं वक्तव्य करतात’; खडसेंनी उडवली चंद्रकांत पाटलांची खिल्ली
- शिवभोजन थाळी केंद्रावरील गैरप्रकारावरून छगन भुजबळ यांचा कारवाईचा इशारा
- पुण्यातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य वन विभागाकडे हस्तांतरित होणार; मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा
- काँग्रेसचा पंजाबसाठीच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केली घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

