🕒 1 min read
मुंबई: काल 16 डिसेंबर रोजी दिल्लीत ‘विजय दिन’ साजरा करण्यात आला. १६ डिसेंबर १९७१ मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकले होते. या पार्श्वभूमीवरच भारतात 16 डिसेंबर हा दिवस ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या नावाचा उल्लेख कुठेही करण्यात आला नाही असा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका सभेत बोलताना केला.
‘मला तो दिवस आठवला ३१ ऑक्टोबर ज्या दिवशी माझी आजी (इंदिरा गांधी ) देशासाठी शहीद झाल्या. त्यानंतर मला आठवला २१ मे ज्यादिवशी माझे वडील (राजीव गांधी ) देशासाठी शहीद झाले. कुर्बानी (त्याग ) चे नाते आहे, तुमचे आणि माझे. बांगलादेश युद्धानिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात इंदिरा गांधींचे साधे नाव सुद्धा घेतले नाही. ज्या स्त्रीने या देशासाठी ३२ गोळ्या छातीवर झेलल्या त्या स्त्रीचे साधे नाव सुद्धा घेतले जात नाही. कारण हे सरकार सत्याला घाबरते. असा आरोप करत खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
बांगलादेश युद्धानिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात इंदिरा गांधींचे साधे नाव सुद्धा घेतले नाही. ज्या स्त्रीने या देशासाठी ३२ गोळ्या छातीवर झेलल्या त्या स्त्रीचे साधे नाव सुद्धा घेतले जात नाही. कारण हे सरकार सत्याला घाबरते: खा. राहुल गांधी pic.twitter.com/6cW7gsstdR
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 17, 2021
दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या ७१ च्या युद्धात भारताचे ३९०० सैनिक शहीद झाले. तर ९८५१ जवान जखमी झाले. पूर्व पाकिस्तानच्या सैन्याचे कमांडर लेफ्टनंट जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाझी यांच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी हातातील शस्त्र जमिनीवर ठेवून भारतासमोर बिनशर्त शरणागती पत्करली.भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली. या युद्धाचे स्मरण राहावे म्हणून 16 डिसेंबर हा दिवस ‘विजय दिन’ म्हणून साजरा केल जातो.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी युपीत एकही मृत्यू नाही; योगी सरकारचा दावा
- ‘थकबाकीचा डोंगर वाढतोय, राज्याच्या हक्काचे पैसे मिळायलाच पाहिजे’, शिवसेनेचा केंद्राला इशारा
- बाहेरच्या बाहेर खंडणीचा निधी मिळत असेल तर सरकारी निधीची गरज काय?
- महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी
- केंद्रातील भाजपा व संघांचा आरक्षण संपवण्याचा डाव-नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
