Share

जेष्ठ नेत्यांचे पक्षनिष्ठेपेक्षा पुत्रप्रेमाला जास्त प्राधन्य : राहुल गांधी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत लाजीरवाणा पराभव झाल्याने कॉंग्रेस पक्षात कामालीची नाराजी आहे. त्यातच कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अध्यक्ष पदाचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. मात्र मी माझ्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे स्पष्ट संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीतील पराभावाची समीक्षा करण्यासाठी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक शनिवारी बोलावण्यात आली होती. यावेळी राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांच्या पुत्रप्रेमाबाबत भाष्य करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, पक्षातील जेष्ठ नेत्यांनी पक्षनिष्ठेपेक्षा पुत्रप्रेमाला जास्त प्राधन्य दिले. मुलांना तिकीट मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांकडून दबाव आणण्यात आला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देखील आपल्या मुलांना उमेदवारी देण्यासाठी दबाव आणला. मात्र मी त्याबाबत फारसा अनुकूल नव्हतो, असे राहुल गांधी म्हणाले.

तसेच ज्या राज्यांमध्ये कांग्रेसची सत्ता आहे अशा राज्यांमध्ये पक्षाची कामगिरी अत्यंत खराब झाली. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाच्या नेत्यांनी म्हणावे तसे गांभीर्य दाखवले नाही. प्रचारादरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवरून भाजपा आणि मोदींविरोधात एक भक्कम जनमत तयार केले गेले नाही, अशी नाराजीही राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!