Share

राहुल आणि रहाणे ‘या’ रणनीतीसह करतील डावाची सुरुवात

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. लोकेश राहुल (KL Rahul) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय डावाची सुरुवात करतील. याआधी सोमवारी सामन्याचा दुसरा दिवस पावसामुळे वाहून गेला. आज भारत कोणत्या प्लॅनिंगसह उतरणार आहे हे जाणून घेऊया.

विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 292 धावा केल्या आहेत. लोकेश राहुलने शानदार शतक झळकावले, तर फॉर्मबाबत प्रश्नांनी घेरलेल्या रहाणेने शानदार फलंदाजी केली. राहुल १२२ आणि अजिंक्य ४० धावांवर नाबाद आहेत. भारतासाठी पहिला दिवस उत्कृष्ट ठरला, मात्र दुसऱ्या दिवसाच्या पावसाने विराट कोहली आणि संघाची चिंता वाढवली. आता टीम इंडियाला आपली रणनीती बदलावी लागणार आहे.

आज अजिंक्य रहाणे आणि केएल राहुल क्रीझवर आल्यावर त्यांचे पहिले काम असेल सुरुवातीच्या षटकांमध्ये स्वतःला सांभाळणे. दोन्ही संघांसाठी आज सुरुवातीची षटके महत्त्वपूर्ण असणार आहेत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज विकेट्स घेऊन स्वतःला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न करतील.

सेंच्युरियन येथे भारताने पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली. भारताकडून फलंदाजीसाठी आलेल्या केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. भारताने पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. मयंक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक केले. मयंक 60 धावा करून एनगिडीचा बळी ठरला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आला आणि खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार विराट कोहलीसोबत खेळताना केएल राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर त्याने शतकही केले. विराट कोहलीच्या रूपाने भारताने तिसरी विकेट गमावली. कर्णधार विराट कोहली 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!