🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. सध्या रोहित शर्मा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत केएल राहुलला (KL Rahul) कर्णधार बनवले जाऊ शकते, अशी माहिती मिळत आहे.
एका वृत्तानुसार बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि जर तो वेळेवर बरा झाला नाही तर त्याला वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला संघासोबत पाठवणे शक्य होणार नाही. नवीन वनडे कर्णधाराच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाईल.”
कसोटी संघाची घोषणा करताना रोहित शर्माची वनडे कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली. विराट कोहलीच्या जागी रोहितकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. याशिवाय रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये उपकर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र, विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. सौरव गांगुलीच्या वक्तव्यावरून विराट कोहलीने उलट विधान केले होते, त्यामुळे या प्रकरणाने पेट घेतला.
मुंबईत सराव करताना रोहित शर्माला दुखापत झाली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तयारी करत असताना त्याला दुखापत झाली होती. मात्र, त्याचे बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार सुरू आहेत. येत्या एक-दोन दिवसांत भारतीय संघाची घोषणा होणार आहे. निवडकर्ते कदाचित रोहित शर्माच्या फिटनेस अहवालाची वाट पाहत असतील. केएल राहुलला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशा स्थितीत वनडे मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- ज्या पक्षाने देशात लोकशाही प्रस्थापित केली त्याचे आम्ही वारस आहोत- राहुल गांधी
- “‘ही’ परिस्थिती सरकारच्या नाकर्तेपणाची व महाराष्ट्राच्या दुर्देवाची साक्ष देते”
- देशाचा स्वातंत्र्यलढा, लोकशाहीची स्थापना व राष्ट्र उभारणीत काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान-अशोक चव्हाण
- आयपीएलच्या पुढील हंगामात ‘हे’ खेळाडू असणार 10 संघांचे कर्णधार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

