Share

कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी करत आहेत धडपड

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्यात शीतयुध्द सुरू आहे. हा कलह दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर आता पुढील वर्षी होत असलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अंतर्गत वाद मिटवण्याचं मोठं आव्हान काँग्रेस नेतृत्त्वासमोर उभे राहिले आहे.

पंजाबमध्ये सत्ता काँग्रेस सत्तेत असून, विरोधी बाकांवर शिरोमणी अकाली दल आहे. तर आपनेही पंजाबमध्ये पावलं रोवण्यास सुरूवात केली आहे. तीन कृषी कायद्यावरून भाजपा आणि एनडीएतून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीसोबत आघाडी केली. तर काँग्रेसमध्ये गटबाजीला उत आला आहे. काँग्रेसमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धू अशा दोन गटात संघर्ष उफाळून आला आहे. त्यामुळे हा गृहसंघर्ष काँग्रेससाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवत सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून दिग्गज नेत्यांना आपल्या गळाला लावण्यासाठी काही पक्ष प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अमरिंदरसिंग यांच्या जाचाला कंटाळून सिद्धू निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’मध्ये जातील, असे म्हटले जात आहे. सन २०१७च्या निवडणुकीपूर्वी सिद्धू यांनी अकाली दलाविरोधात भूमिका घेत भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हाही ते ‘आप’च्या संपर्कात होते.

या सर्व घडामोडी घडत असताना आता कॉंग्रेसने देखील सावध भूमिका घेतली आहे. पंजाब काँग्रेसमधील धुसफूस थांबवण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी यांनी आता पुढाकार घेतला असून त्यांनी नवज्योत सिद्धू यांना भेटीचे निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंद्र सिंह आणि सिद्धू यांच्यातील भांडणामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी भीती काँग्रेसला आहे. त्यासाठी काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे, हरीश रावत आणि जेपी अग्रवाल यांची समिती नियुक्त केली आहे.आता या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार आणि सिद्धू यानंतर काय पावले टाकणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!