Share

‘इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याची हिंमत तेव्हाच्या न्यायव्यवस्थेत होती’

Published On: 

मुंबई: फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोजी हे भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांना पॅरिस न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणात 1 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.त्यामुळे त्यांना 1 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. सरकोजी 2007 ते 2012 दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये 10 दिवसांपर्यंत या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि पदाचा दुरुपयोग केल्याचाही आरोप आहे.

यावरून आजच्या सामना अग्रलेखातून आपल्या देशात होणाऱ्या पदाचा गैरवापर आणि आर्थिक गैरव्यवहार या प्रकरणी किती राजकारण्यांना शिक्षा भोगावी लागते. यावर टिप्पणी करण्यात आली असून, फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सारकोझी यांच्यावर जे आरोप आहेत ते आपल्या देशात हास्यास्पद ठरवले जातील. तर सध्या न्यायव्यवस्था सरकारच्या ताब्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याची हिंमत तेव्हाच्या आपल्या न्यायव्यवस्थेत होती असे यावेळी सामनामध्ये नमूद करण्यात आला आहे.

‘फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर अशा प्रकरणात तेथील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सारकोझी यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे. ज्या कारणांसाठी सारकोझी यांना तुरुंगात जावे लागणार आहे त्या गुह्यांचे स्वरूप पाहता मि. सारकोझी हे चुकीच्या देशात जन्माला आले. त्याचीच फळे ते भोगीत आहेत.

इंदिरा गांधी यांनी पदाचा दुरुपयोग करून लोकसभा निवडणूक जिंकल्याचा खटला अलाहाबाद उच्च न्यायालयात चालला व निकाल इंदिराजींच्या विरोधात गेला. यशपाल कपूर या सरकारी कर्मचाऱ्याने इंदिरा गांधींच्या प्रचार यंत्रणेत भाग घेतल्याचा ठपका ठेवून पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींची निवडणूकच रद्द केली गेली. इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याची हिंमत तेव्हाच्या आपल्या न्यायव्यवस्थेत होती हे आज आम्ही येथे खास नमूद करीत आहोत. आज आपली संपूर्ण शासकीय यंत्रणाच सरपटत आहे. न्यायालये आणि निवडणूक आयोग तरी स्वतंत्र आणि निःपक्ष आहेत काय?

प. बंगालची निवडणूक ज्या पद्धतीने आठ टप्प्यांत जाहीर केली तो सर्वच प्रकार संशयास्पद आहे. राजकीय दबावाशिवाय हे शक्य नाही व हाच राजकीय दबाव भ्रष्टाचार मानून निकोलस सारकोझी यांना पॅरिसच्या न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. त्यातील एक वर्षाचीच शिक्षा त्यांना प्रत्यक्षात भोगायची आहे, पण पदाचा गैरवापर, निवडणुकीतील बेकायदा अर्थकारण हे प्रकार तेथे शिक्षेस पात्र ठरले. सारकोझी चुकीच्या देशात जन्मास आले, दुसरे काय ! असे आजच्या सामना अग्रलेखातून भारताच्या आणि फ्रान्स च्या न्यायव्यवस्थेची तुलना करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!