औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी परिसरातील डब्ल्यू ७९, स्थित ध्रुवतारा या प्लास्टिक कंपनीला मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. अद्यापपर्यंत ही आटोक्यात आलेली नाही. अग्निशामक विभागाच्या पाच गाड्यासह खाजगी टँकरने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
वाळूज एमआयडीसी परिसरात कामगार चौकाजवळ डब्ल्यू ७९ सेक्टरमध्ये ध्रुवतारा नावाची प्लास्टिक कंपनी आहे. या कंपनीत मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच वाळूज फायर ब्रिगेडचे अधिकारी दोन बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. बराच वेळ शर्थीचे प्रयत्न करूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत असल्याने औरंगाबाद महानगरपालिका अग्निशमन दलाचे दोन फायर बंब, गरवारे आणि बजाज कंपनीचे फायर बंब आणि ३ खाजगी टँकर मागवण्यात आले.
दरम्यान, सकाळी साडेनऊपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नव्हते. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांना स्पीड पोस्टने पाठवल्या गोवऱ्या; गॅस दरवाढीचा निषेध
- औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा
- कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निर्बंध कडक करा; अर्जुन खोतकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- संत नामदेवांच्या जयंतीचा उल्लेख परिपत्रकात करा; वर्षा गायकवाड, राजीव सातव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- प्रेट्रोल, डिजेल दरवाढीनंतर या कारणामुळे परभणी पुन्हा चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

