नांदेड : कोरोना संसर्गामुळे सर्व शाळा महाविद्यालये बंद झाली. यावर उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झाला. आणि मग सुरु झाले ऑनलाईन शिक्षणाचे धडे. ऑनलाईन शिक्षणामुळे अप्रत्यक्षरित्या शिक्षक व विद्यर्थ्यी जास्त वेळ संपर्कात राहु लागले. पण याच ऑनलाईन शिक्षणाचा गैरफायदा घेत एका शिक्षकाने आपल्याच विद्यार्थीनीशी अश्लील चॅटिंग करत गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासला आहे.
नांदेड तालुक्यातील नायगाव तालुक्यीतील देगाव येथे एक खासगी शाळा आहे. येथील एक सहशिक्षक नवव्या वर्गात शिकणाऱ्या आपल्याच एका विद्यार्थीनीसोबत रात्री मोबाइलवर अश्लील चॅटींग करत होता. ती विद्यार्थीनी शाळेत आली की तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्नही करत होता. सदर मुलीने आपल्या कुटुंबातील व्यक्तींना हा प्रकार सांगितला. हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर मंगळवारी सकाळी विद्यार्थीनी व तिचे नातेवाइक शाळेत आले. शाळेत आल्यानंतर विद्यार्थीनीच्या कुटूंबयांनी शिक्षकाला जाब विचारला.
यावर सदर शिक्षकाने उद्धटपणाची भाषा वापरली असता नातेवाइकांनी शिक्षकास धक्काबुक्की केली आणि कुंटूर पोलिसांना हा प्रकार सांगितला. या दरम्यान शाळेत मोठा जमाव जमा झाला होता. काही वेळातच पोलिस तेथे पोहोचली. यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांनी शिक्षकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी कुंटूर पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध ॲट्रासिटी व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘केंद्रातील पक्षाचा अर्थपुरवठा पवित्र मात्र विरोधकांचे चणे-कुरमुरेही बेकायदेशीर’
- ‘सारकोझी यांच्यावरील आपल्या देशात हास्यास्पद; ते चुकीच्या देशात जन्मास आले’
- प्रेट्रोल, डिजेल दरवाढीनंतर या कारणामुळे परभणी पुन्हा चर्चेत
- एक कायदा मागे घेतला तर सर्वच कायदे मागे घ्यावे लागतील: रामदास आठवले
- संत नामदेवांच्या जयंतीचा उल्लेख परिपत्रकात करा; वर्षा गायकवाड, राजीव सातव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

