Share

कडकनाथ कोंबडी घोटाळा : ‘खोत यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत खुलासा करावा’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या आमिषाने महारयत अॅग्रो या कंपनीकडून राज्यभरातील शेतकऱ्यांची 500 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. ही कंपनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचं बोललं जातंय.

कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत त्यांनी खुलासा करावा. त्याचबरोबर या घोटाळ्यातील दोषींवर सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी कोल्हापुरात शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान , कडकनाथ कोंबडी घोटाळयावरून शेतकरी नेते राजू शेट्टी आणि कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत आमनेसामने आले आहेत. कडकनाथ घोटाळ्यातील आरोपींना खोत पाठीशी घालत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला होता. आता शेट्टी यांना प्रत्युत्तर देताना खोत यांची जीभ घसरली आहे.

शेट्टी यांनी आपल्या विरोधात भर चौकात पुरावा दाखवावा, पुरावा दाखवता येणार नसेल तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी भर चौकात विष्ठा खावी, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. राजकीय लढाई राजकारणाच्या पातळीवर लढावी, राजू शेट्टी यांना कोंबडीचे तांगडे खायची सवय आहे. त्यांना दुसरे काही आठवणार नाही, असा आरोप खोत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!