Share

वेस्टइंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याकरता या चार खेळाडूंचे पुनरागमन

Published On: 

अहमदाबाद : वेस्टइंडीज विरुद्ध भारत या दोन संघात ६ फेब्रुवारी पासून ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर ही वेस्टइंडिज विरुद्ध भारत यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्टइंडीजचा ६ गडी राखून दारुण पराभव केला. या सामन्यात भारतातर्फे गोलंदाजी करताना युझवेन्द्र चहल याने वेस्टइंडीज संघाचे ४ गडी बाद केले तर फलंदाजी करताना भारतातर्फे रोहित शर्माने ५१ चेंडूत ६० धावांची तडाखेबाज खेळी केली.

भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यात पहिला एकदिवसीय सामना सुरु  होण्यापूर्वी भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यामुळे ४ खेळाडूंसह एकूण ७ जण कोरोना विषाणूने बाधित झाले होते. त्यामुळे या चारही क्रिकेट खेळाडूंना वेस्टइंडीज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकावे लागले होते. तर के.एल.राहुल सुद्धा अनिवार्य विलगीकरणात होता.

मात्र आता भारतीय एकदिवसीय संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. वेस्टइंडीज विरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघातील शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, के.एल.राहुल, नवदीप सैनी आणि मयांक अगरवाल हे विलगीकरणात होते. या खेळाडूंपैकी लोकेश राहुल, मयांक अगरवाल आणि नवदीप सैनी  या खेळाडूंचे विलगीकरण आता समाप्त झाले असून, ते आता वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध असू शकतात. त्यामुळे भारतीय संघ अजून मजबूत झाल्याची भावना क्रिकेट रसिकांमध्ये झाली आहे. त्यामुळे आता त्यांचा नावाचा विचार भारतीय संघ निवडीसाठी करू शकतो.

      महत्वाच्या बातम्या :    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!