Share

“ विराटची मनःस्थिती सध्या ठीक नाहीये ” ; आकाश चोप्राचा दावा

Published On: 

मुंबई : भारताच्या सर्व फॉरमॅट मधील कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीला सगळीकडूनच सल्ले ऐकायला मिळत आहेत. त्याने कर्णधारपद सोडल्यावर त्याच्या फलंदाजीत मोठा फरक जाणवेल असे सगळ्यांना वाटले होते.मात्र वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला दोन आकडयांपर्यंतही पोहचता आले नाही. यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने विराटची मनःस्तिथी ठीक नसल्याचे मोठे वक्तव्य केले आहे.

विराट अवघ्या ४ चेंडू खेळून बाद झाल्याने आकाश चोप्राने आश्चर्य व्यक्त करत सांगितले ‘ विराट कोहली हा खेळ चालवणारा व्यक्ती आहे. त्याला पद्धतशीरपणे कसे खेळायचे हे माहिती असते. अगदी दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतही तो पहिल्या सारखे खेळत नसल्याची चर्चा होती जी पूर्णपणे बरोबर होती पण तो लवकर धावत होता. जेव्हा तुम्ही अहमदाबादच्या खेळपट्टीवर त्याची खेळी पाहता, तेव्हा ती एक विचित्र खेळी होती असे दिसते. आणि तिथेच प्रत्यक्ष दिसते की त्याच्या मानसिकतेत काहीतरी ठीक नाहीये.”

वेस्ट इंडिज दौऱ्यात विराटने केवळ ८ धाव केल्या मात्र तो आता एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा क्रिकेटपटू बनला आहे, ज्याने भारतात ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकत भारतात सर्वात जलद ५००० एकदिवसीय धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!