🕒 1 min read
मुंबई : मागील अनेक वर्षांपासून बंद असलेली ग्रामीण भागातील लोकप्रिय बैलगाडा शर्यत आणि बैलांची झुंज हे कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु करावे यासाठी बैलगाडा प्रेमींचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले आहेत की,’बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशूधनाचा जीवापाड सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजेच बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले,’अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आपली संस्कृती, परंपरा टिकवणाऱ्या या शर्यतींसाठी चिवटपणे लढा देणाऱ्या पशूप्रेमींचेही त्यांनी अभिनंदन केले. शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार, पशूधनाचा छळ होऊ नये. त्याबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 16, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आपली संस्कृती, परंपरा टिकवणाऱ्या या शर्यतींसाठी चिवटपणे लढा देणाऱ्या पशूप्रेमींचेही त्यांनी अभिनंदन केले. शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार, पशूधनाचा छळ होऊ नये. त्याबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे,’असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आपल्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार…’, अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आनंद
- धक्कादायक! सोनू सूदनं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केलेल्या महिला नेमबाज खेळाडूची आत्महत्या
- राजकीय बॅनरबाजीतून औरंगाबादचे विद्रुपीकरण; औरंगाबाद मनपाची थातूरमातूर कारवाई..!
- डेटा करण्यासाठी लागणारा निधी त्वरित देणार- अजित पवार
- बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
