Share

आर माधवनलाही कोरोनाची लागण तरीही म्हणतो All IS WELL

Published On: 

मुंबई : मागील अनेक दिवसापासून बॉलीवूडमध्ये कोरोनाने आपला शिकार अनेक कलाकारांना बनवले आहे. काही दिवसापुर्वी बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनीस्ट अमिर खानला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आर माधवनलाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्याने स्वत: ट्विट करुन दिली. माधवनने माहिती देताना ‘३ इडियट्स’ चित्रपटाचा संदर्भ वापरत ही माहिती दिली आहे.

आमिर खान आणि माधवन यांनी रंग दे बसंती आणि ३ इडिअट्स या चित्रपटात एकत्र काम केलेले आहे. यात ३ इडियट्स मधिल त्यांची जोडी अजुनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याच चित्रपटाचा संदर्भ देताना आर. माधवन म्हणतो की, फरहान नेहमीच रँचोला फॉलो करण्याच्या प्रयत्नात असतो. यादरम्यान व्हायरसही आमच्या मागे असतो. मात्र यावेळी व्हायरसच्या तावडीत आम्ही सापडलो आणि त्याने आम्हाला पकडले. पण काळजी नसावी ALL IS WELL

आम्ही लवकरच बरे होऊन परत येऊ. पण राजुला अशा जागी आम्ही येऊ देणार नाही. काळजी नसावी आम्ही लवकरच बरे होऊ आणि परत येऊ. सर्वांचे आभार. बुधवारी अमिरची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होत. मागील काही दिवसात रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, आशिष विद्यर्थी आणि संजय लीली भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!