औरंगाबाद : राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन विभागाकडून औरंगाबाद महापालिकेला कोरोना प्रतिबंधासाठी अडिच कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. या प्राप्त निधीतून पालिकेचे दहा रुग्णवाहिका खरेदी करण्याचे नियोजन आहे. तसेच सर्व आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक ते साहित्य देखील खरेदी केले जाणार आहे.
वाढत्या कोरोना रूग्णांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कमी पडू लागली आहे. यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध नसल्याने पालिकसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. या विभागातर्फे पालिकेला मदत करण्याची विनंती त्यांनी केली. त्यांची विनंती गुप्ता यांनी लगेचच मान्य करत अडिच कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय सांगितला.
ही माहिती पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी गुरूवारी दिली. त्यांनी सांगितले की, राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून मिळणार्या अडिच कोटी रुपयांमधून पालिका दहा रुग्णवाहिका खरेदी करणार आहे. त्याशिवाय प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, रेफ्रिजरेटर, डिपफ्रीजर, फ्रीज आदी साहित्य देखील खरेदी करण्याचे नियोजन आहे. यामुळे पालिकेची सर्व आरोग्य केंद्रे व दवाखाने आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- मृत्यूपूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपाली चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलंय?
- कोरोनाचे नियम पाळाल तरच मिळणार पेट्रोल : पेट्रोल डिलर्स असोशिएशनचा निर्णय
- नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाला लवकरच होणार सुरुवात
- तिथीनुसार शिवजयंतीवर देखील राज्य सरकारने लादले निर्बंध, नियमावली जाहीर !
- फक्त त्यांची दाढी वाढलीये आणि स्क्रू ढिला झालाय; ममता बॅनर्जींची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
