नांदेड : देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यातच महाराष्ट्रामध्ये कोरोनाची संख्या अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाकडून खबरदारी म्हणून राज्यातील काही भागामध्ये लॉकडाऊन करण्यात आले, तर काही ठिकाणी कडक नियम लागू करण्यात आले.
राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजार पुढे गेली आहे. तसेच एका दिवसात ६८७ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढला असल्याने मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांग लागली आहे.
मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना १२ तास लाईनमध्ये राहावं लागत आहे. नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे नांदेडकर आणि जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.नांदेडसह इतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. परंतु कोरोनाची पुन्हा लाट आल्याने प्रादुर्भाव वाढला आहे.
नांदेडमध्ये कोरोनाने हैदोस घातला असून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढला आहे. नांदेड शहरातील मृतांची संख्या वाढल्यामुळे शहरात असलेल्या गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी रांग लागली होती. यामध्ये काही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी १२ तास वाट पाहावीवी लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाची सुनावणी पूर्ण; आता सकारात्मक निकालाची अपेक्षा – अशोक चव्हाण
- तिथीनुसार शिवजयंतीवर देखील राज्य सरकारने लादले निर्बंध, नियमावली जाहीर !
- ‘मनमोहन सिंहांच्या काळात पेट्रोलवर १ रुपया रस्ते विकास कर होता, तो मोदींनी १८ रुपये केलाय’
- पुण्यात कोरोनाचा कहर : नवीन नियमावली जाहीर, वाचा काय राहणार सुरु काय होणार बंद !
- ‘लॉकडाऊन‘ मध्येही विद्यापीठाच्या परीक्षा होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

