नवी दिल्ली : भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विन म्हणाला आहे की ज्या दिवशी शेन वॉर्न यांचे निधन झाले होते. त्या दिवशी भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड खूप दुखी झाले होते. अश्विनने जेव्हा द्रविडला याबद्दल विचाले असता त्यांनी त्याला वॉर्नबद्दल एक गोष्ट सांगितली.
अश्विन आपल्या यू ट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला की, “द्रविड आणि वॉर्न यांनी बरेच वर्षे एकमेकांसोबत क्रिकेट खेळले आहे. तर हे दोघे राजस्थान रॉयल्ससाठीही तीन वर्षे बरोबर राहिले आहेत. मी द्रविडबर बोललो त्यावेळी ते खूप दुखी होते.
अश्विन म्हणाला की, द्रविड आणि वॉर्नमध्ये बोलणे चालू असताना द्रविडने त्याला एक प्रश्न विचारला. की तुझे खांदे एवढे मजबूत कसे? त्यावर वॉर्न म्हणाला ऑस्ट्रेलियामध्ये एक खेळ आहे. जो रग्बी खेळासारखाच आहे. जो मी लहानपणी खेळायचो. त्यामुळे माझे शरीर असे आहे. मला लहानपणापासूनच या खेळाची आवड होती परंतु लहानपणी माझ्या पायाचे हाड मोडल्यामुळे भविष्यात मी हा खेळ खेळू शकलो नाही.”
एका फिरकी गोलंदाजासाठी त्याचे खांदे आणि शरीर मजबूत असणे खूप गरजेचे असते. कारण तुम्हाला चेंडू वेगवेगळ्या प्रकारे फिरवायचा असतो. फिरकी गोलंदाजाला जास्तीत जास्त नेटमध्ये गोलंदाजी करणे गरजेचे असते.
महत्वाच्या बातम्या :


