🕒 1 min read
मुंबई: काल मुंबईत सेनेच्या कार्यकर्त्यावर ईडीने कारवाई केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेना नेते राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. मात्र भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या प्रकरणाचा थेट दिशा सालियन प्रकरणाशी संबंध जोडला होता. आता यावर स्वतः राहुल कनाल याचं प्रतिक्रिया दिली आहे.
“सर्वोच्च यंत्रणेने माझा सीडीआर तपासावा. पण केवळ ८ आणि १३ जूनचा नाही तर संपूर्ण वर्षांचा तपासावा. त्यात जर काही आढळले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का? कायम लक्षात ठेवा, देव महान आहे आणि कायम सत्यासोबत असतो. लोकांना फोन करत रहा आणि आनंद घेत रहा.” असे ट्वीट करत कनाल यांनी आमदार नितेश राणे यांना टोला लगावला आहे.
Burnol moment !!! I challenge you openly let’s track my CDR would request the highest agency to track it not only 8th-13th but for the entire year and if there is nothing will you resign ? Always remember God is Great and with the truth always…Keep calling people n enjoy lol… https://t.co/uf6BQQCdyX
— Rahool N Kanal (@RahoolNKanal) March 9, 2022
काय म्हणाले होते नितेश राणे?
राहुल कनाल यांचा दिशा सालियन प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत तपास झाला पाहिजे असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. ८ जूनला दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री आणि १३ तारखेला राहुल कनाल कुठे होता? त्यावेळचं राहुल कनालचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं पाहिजे. यामधून काहीतरी लिंक नक्की सापडेल. असे राणे यांनी म्हटले आहे.
तसेच राहुल कनाल हा आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ गँगचा भाग असून त्याचे वडील डेंटिस्ट होते. मग राहुल कनालकडे इतका पैसा कुठून आला? त्याच्याकडे कोणाचा पैसा आहे? राहुल कनाल मुंबईत ‘भाईजान’ हे हर्बल हुक्कापार्लर चालवतो. तसेच तो कॅफे बांद्रा नावाचं रेस्टाँरंट चालवतो. राज्यपालनियुक्त आमदारांच्या यादीतही त्याचा समावेश आहे. मात्र त्याच्यावर एवढी कृपादृष्टी का? असा सवालही राणे यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
- दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का, हा महत्वाचा गोलंदाज आयपीएल २०२२ मधून होणार बाहेर?
- गृहमंत्री उद्या देणार फडणवीसांच्या आरोपांना उत्तर; काय असेल राज्यसरकारचे स्पष्टीकरण?
- ‘दाऊदच्या दलालांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’; आशिष शेलारांचा इशारा
- IPL 2022: दीपक चहरच्या पुनरागमनाबाबत मोठी उपडेट; या तारखेला चेन्नई संघाशी जुळणार!
- ‘ते’ संभाषण खरे की खोटे शरद पवारांनी सांगावे; भातखळकरांचे आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
