Share

CID मधील दयाची मराठी चित्रपटात एंट्री…! दिसणार एका महत्त्वपूर्ण भूमिकेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टेलिव्हीजन विश्वातील सर्वात मोठा क्राईम शो ठरलेल्या ‘सीआयडी’ या मालिकेतील एसीपी प्रद्युम्नसोबत आणखी एक कॅरेक्टर खूप पॉप्युलर झालं ते म्हणजे दया. अभिनेता दयानंद शेट्टी हा आता मराठीत पदार्पण करतोय. नुकत्याच मुहूर्त झालेल्या ‘गरम किटली’ या मराठी चित्रपटात दया एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

गणेश रॉक एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली ‘गरम किटली’ या चित्रपटाची निर्मिती केली जात असून चित्रसेन नाहक आणि राजेश हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नुकताच मुहूर्त झाल्यानंतर लगेचच ‘गरम किटली’च्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. कथा, पटकथा आणि संवादलेखन करणारे राज पैठणकर या चित्रपटाचं दिग्दर्शनही करत आहेत. ‘सीआयडी’ मालिकेतील ‘दया दरवाजा तोड दो…’ हा संवाद अगदी लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच तोंडपाठ झाला आहे. आता मराठी प्रेक्षकांना आपल्या मातृभाषेतील चित्रपटामध्ये दयाचा जलवा पहायला मिळणार आहे. दया आता ‘गरम किटली’ घेऊन मराठी रसिकांसमोर येणार आहे.

  • ‘गरम किटली’मध्ये दया नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार हे सध्या गुपितच तरी ठेवण्यात आलं आहे. वेळ आल्यावर त्यावरूनही पडदा उठेल असं सांगण्यात येत आहे. यात दयासोबत आदित्य पैठणकर व श्रद्धा महाजन ही नवी जोडी आणि विजय पाटकर, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, विशाखा सुभेदार, मनीषा पैठणकर, विराज गोडकर, पल्लवी पाटील आदी कलाकार आहेत. राज पैठणकरनंच यातील गीतरचना लिहील्या असून, किरण-राज या संगीतकार जोडीनं त्या संगीतबद्ध केल्या आहेत. अनिकेत के. सिनेमॅटोग्राफर, तर योगेश महाजन क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. कपिल चंदन या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, देवदत्त राऊत आणि नंदू मोहरकर कला दिग्दर्शक म्हणून काम पहात आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!