🕒 1 min read
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली आहे.
राज्यातील महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था आणि दिशा कायद्याबाबत विषयांवर चर्चा करण्यात यावी, असे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तसेच याच विषयांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे एक अधिवेशन बोलवावे, असेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे परत एकदा राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
साकीनाका खैरानी रोड येथे मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार कंट्रोल रुमला प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गीतेंच्या वक्तव्याचा सरकारशी काही संबंध नाही’, संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- ‘शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, आघाडी नको असाच आवाज येईल’; सुधीर मुनगंटीवार यांची टीका
- ‘राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत,आम्ही शिवसैनिकच आहोत’
- राष्ट्रवादीचा जन्मच कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय-अनंत गीते
- चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही; नाना पटोले यांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
