🕒 1 min read
सिडनी : क्वीन्सलॅण्ड सरकारच्या कोरोनासंबंधितच्या कडक नियमांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पत्राद्वारे टीम इंडियाच्या खेळाडूंना या कसोटीसाठी सूट देण्यात यावी, अशी मागणी केली होती. पण यानंतर 24 तासांच्या आतच ब्रिस्बेनमध्ये तीन दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
चौथ्या कसोटीदरम्यान 36 हजार क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पुढाकार घेण्यात आला होता. पण आता ब्रिस्बेनमध्ये कोरोनाबाधित वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आता इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात येणार नाही.
दरम्यान, चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. पण भारतीय टीमला चौथ्या टेस्टसाठी ब्रिस्बेनला जायचं नाही, अशी बातमी समोरआली होती. यामागचं प्रमुख कारण टीमला पुन्हा क्वारंटाईन व्हायचं नाही, कारण सिडनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात
- रोहितच्या नादात चाहत्याने काढली अर्धी मिशी; सोशल मीडियावर जोरदार चर्चा
- ‘टिवटिव’ कायमची बंद ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरची मोठी कारवाई…
- ‘बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या महाराष्ट्रात लागले नाही’; राऊतांचा मोदींवर घणाघात
- उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचं प्रत्युत्तर !


