🕒 1 min read
सिडनी : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा हिट-मॅन रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांसाठी मेलबर्नमध्ये टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. रोहित शर्माच्या कसोटीतील प्रतिभावरुन आणि खेळण्यावरुन अर्धी मिशी काढेन अशी एका व्यक्तीनं पैज लावली होती. पैज हरल्यामुळे त्या व्यक्तीनं खरोखरचं आपली अर्धी मिशी काढली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्या व्यक्तीची जोरजार चर्चा सुरु आहे.
सिडनी कसोटी सामन्याआधी भूषण कदम या क्रीडा चाहत्यानं आपल्या ट्विटवर रोहित शर्माच्या समावेशाबाबत प्रश्न विचारला होता. रोहित शर्माला तिसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यासाठी कोणाला डच्चू देण्यात यावा? असा प्रश्न विचाराला होता. या प्रश्नावर या युजरने ‘रोहित कसोटी क्रिकेटपटू असेल तर मी जगातला सर्वात हँडसम पुरुष आहे. ब्रॉड आणि अँडरसनचं एकेक षटक खेळून काढून दाखवू दे त्याला. ते जाऊ दे. स्टार्क, हेजलवुड आणि कमिन्स यांचे सगळे मिळून तीस चेंडू खेळून काढू दे, मी अर्धी मिशी काढून टाकतो,’ असं म्हटलं होतं. सिडनी कसोटी सामन्यातील पहिल्याच डावात रोहित शर्मानं ७७ चेंडूचा सामना करताना २६ धावांची खेळी केली. रोहित शर्माच्या या खेळीनंतर काही नेटकऱ्यांनी अजयला ट्रोल करण्यासाठी त्याच्या वक्तव्याची आठवण करुन दिली.
अजयने आपला शब्द पाळला. त्यांनी खरेच आपली अर्धी मिशी काढली. आर्ध्या मिशीवरील फोटो अजयनं आपल्या ट्विटवर पोस्ट केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.अर्धी मिशी काढून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिल्यानंतर काहींनी त्याला म्हटलं की आभासी जगात लावली शर्यत होती. तुम्ही कशाला अर्धी मिशी काढायची. यावर अजय म्हणाला की, ‘बऱ्याच जणांनी मी अर्धी मिशी काढल्याबद्दल नावं ठेवली. पण मला माझ्या क्रिकेटवेडेपणाचा खूप अभिमान होता आणि आहे. तरीदेखील मी सिडनी डोळ्यासमोर असताना पैज लावण्याची चूक केली. म्हणून खूप विचारांतीच मी अर्धश्मश्रूमुंडन केलं आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी , मात्र शरद पवारांनी आपलंसं केलं
- शिवसेनेच्या खासदाराने केला छत्रपती संभाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख
- बॉम्बेचं मुंबई झालं मग औरंगाबादचं संभाजीनगर का नाही ? उदयनराजे कडाडले
- शेतकऱ्यांनी दिला ‘जिंकू किंवा मरू’चा नारा; सरकार-शेतकरी यांच्यातील आठवी फेरी देखील निष्फळ
- ‘बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या महाराष्ट्रात लागले नाही’; राऊतांचा मोदींवर घणाघात


