Share

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचं प्रत्युत्तर !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांत करण्यास विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.

काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत नामांतराला तीव्र विरोध केला आहे. तर, दुसरीकडं CMO अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटद्वारे शासन निर्णय वा इतर माहिती देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगपाखड केली होती.

या सर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. संभाजीनगर असा CMOवर होणारा उल्लेख काही नवा नाही. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर असा उल्लेख केला आहे. त्यात नवीन काय केलं मी? जे वर्षानुवर्षे बोलत आणि करत आलोय तेच मी करतोय. औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात जो सेक्युलर हा शब्द आहे त्यात औरंगजेब बसत नाही,’ असं त्यांनी काँग्रेसला खडसावलं आहे.

आता यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘या प्रकरणात औरंगजेब हा विषय नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे देखील आराध्य दैवत व श्रद्धास्थान आहेत. नामांतराच्या कारणाने जे राजकारण होतं आणि माणसांत भेद निर्माण होतात, ते होऊ नये याकरिता काँग्रेस नामांतराला विरोध करत असतं. आमची भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांना व्यवस्थित पटवून देऊ,’ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!