सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झाला आहे. या सामन्याचा शनिवारी तिसरा दिवस असून भारताचा पहिला डाव १००.४ षटकात २४४ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय संघ ९४ धावांनी पिछाडीवर पडला आहे.
भारताकडून या डावात शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने अर्धशतके केली. या दोघांनीही प्रत्येकी ५० धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला ५० धावांचा आकडा गाठता आला नाही. त्या दोघांपाठोपाठ रिषभ पंतने सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्याचबरोबर रविंद्र जडेजाने नाबाद २८ धावा केल्या. तसेच भारताचे ३ क्रिकेटपटू धावबाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जॉस हेजलवूडने २ आणि मिशेल स्टार्कने १ विकेट घेतली.
पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर भारताची तळातील फलंदाची गडगडली. पुजारा बाद झाल्यानंतर आर अश्विन ९३ व्या षटकात धावबाद झाला. त्याला पॅट कमिन्स आणि मार्नस लॅब्यूशानेने मिळून धावबाद केले. अश्विनने १० धावा केल्या. तर पदार्पण करणारा नवदीप सैनी ४ धावांवर असताना ९५ व्या षटकात मिशेल स्टार्कच्या चेंडूवर मॅथ्यू वेडकडे झेल देऊन बाद झाला. त्यापाठोपाठ लगेचच ९७ व्या षटकात लॅब्यूशानेने जसप्रीत बुमराहला धावबाद केले. अखेर मोहम्मज सिराजची विकेट कमिन्सच्या गोलंदाजीवर गेल्याने भारताचा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला. सिराज ६ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजा २८ धावांवर नाबाद राहिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या महाराष्ट्रात लागले नाही’; राऊतांचा मोदींवर घणाघात
- ‘टिवटिव’ कायमची बंद ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरची मोठी कारवाई…
- रोहितच्या नादात चाहत्याने काढली अर्धी मिशी; सोशल मीडियावर जोरदार चर्चा
- उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचं प्रत्युत्तर !
- ‘तुम्ही जर भारतविरोधी असाल तर तुम्हाला काम/बक्षिसे मिळतील, मात्र राष्ट्रवादी असाल तर…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

