इंग्लंड : गेल्या काही दिवसापासुन भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर काही काळासाठी भारतीय संघ सुट्टीवर गेला होता. यानंतर आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ विलगीकरणात पोहोचणार होता, मात्र यादरम्यान दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली अशी धक्कादायक माहिती समोर आली.
पाकिस्तान विरुद्धच्या वन-डे मालिकेपूर्वी इंग्लंड टीममधील सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला संपूर्ण टीम बदलावी लागली होती. इंग्लंडमध्ये कोरोना पेशंट्सचं प्रमाण रोज वाढत असताना देखील इसीबीनं एक धक्कादायक निर्णय घेतला. भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट मालिकेसाठी क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल कोणताही बदल ECB ने केला नाही.
I fear for the 100 & the Indian Test series unless the isolation laws change .. we are bound to have cases as is the case with @RishabhPant17 .. plus further down the line I fear the Ashes could be hugely affected with players pulling out unless bubbles/quarantine rules change !
— Michael Vaughan (@MichaelVaughan) July 15, 2021
त्याचा परिणाम भारत-इंग्लंड मालिकेवर होईल अशी भीती इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने व्यक्त केली आहे. विलगीकरणाच्या नियमांमध्ये बदल न झाल्यास द हंड्रेड आणि भारतीय कसोटी मालिकेबाबत मला भीती वाटते आहे. रिषभ पंतला ज्याप्रकारे कोरोनाची बाधा झाली आहे, त्याचप्रकारे आणखी काहींनाही कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पुढे जाऊन अॅशेस मालिकेतून काही खेळाडू माघार घेण्याचीही भीती आहे. त्यामुळे बायो-बबल आणि क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल होणे गरजेचे आहे, असे वॉनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.
महत्वाच्या बातम्या
- पंजाब नॅशनल बँककडून नोकर धारकांना मिळणार 3 लाखांचा लाभ
- प्रशिक्षक राहुल द्रविडकडून नवखे खेळाडू शिकण्यास उत्सुक!
- ‘महाविकासआघाडीचा भाग बनल्यानंतर शिवसेना आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध राहिला नाही’
- आज शरद पवार घेणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट !
- टीम इंडियात कोरोनाचा शिरकाव ; ECBचा धक्कादायक निर्णय!


