Share

आज शरद पवार घेणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : संसंदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार आहे. तर, या सत्राचा समारोप 13 ऑगस्टला होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशनात 20 दिवस कामकाज चालण्याची शक्यता आहे. तर, स्वातंत्र्यदिनापूर्वी संसदेचं पावसाळी अधिवेशन समाप्त होईल. पावसाळी अधिवेशनात कोरोना नियमांचं पालन केलं जाणार आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ज्यांनी कोरोना लस घेतली नाही ते खासदार कोरोना लसीचा पहिला डोस घेतील अशी शक्यता आहे.

पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार विरोधकांना विश्वासात घेण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. याचाच भाग म्हणून आज माजी संरक्षण आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच माजी संरक्षण मंत्री एके अँटोनी हे आज दुपारी 4 वाजता दिल्लीत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत संरक्षण विषयक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

अधिवेशनाच्या तोंडावर भाजपकडून विरोधकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवार-राजनाथ सिंह यांच्या आजच्या भेटीकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. या भेटीत इतर राजकीय विषयावरही चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!