🕒 1 min read
श्रीलंका : भारतीय संघाचा श्रीलंका दौरा हा सुरुवातीपासुनच अडचणीत सापडत आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारताविरुद्ध मालिकेसाठी नवा संघ उभा करण्यात आला. यादरम्यान श्रीलंकेच्या नव्या संघातही कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर ही मालिका ५ दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे निर्धारित कार्यक्रमानुसार ही मालिका १३ ऐवजी १८ जुलैपासून सुरु होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय मालिकेच्या सुधारित वेळापत्रकानंतर श्रीलंका क्रिकेटने दोन्ही संघात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या नवीन वेळा देखील शेअर केल्या आहेत.
भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवनला कॅप्टन बनवण्यात आले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शाश्त्री देखील इंग्लंड दौऱ्यावर आहेत त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांची निवड केली आहे.
श्रीलंका दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यात देवदत्त पडिक्कल, नितिश राणा आणि चेतन सकारिया हे खेळाडू, या खेळाडूंची वर्णी लागली आहे. या दौऱ्यासाठी हे उत्सुक आहेत तसेच प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांच्याकडून शिकण्यास देखील आतुर आहेत.
एका कार्यक्रमादरम्यान पडिक्कलने सांगितले की, ‘राहुल द्रविड हे प्रशिक्षक म्हणून उपलब्ध होणे खूप मोठी गोष्ट असून, याहून चांगलं तुम्ही दुसरं काही मागू शकत नाही. त्यांचासारखा मार्गदर्शक सोबत असणे हा एक शानदार अनुभव आहे. मी आशा करतो की, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यास मिळेल.’
तसेच नितिश राणा म्हणाला, ‘मी ऐकले आहे की प्रशिक्षक म्हणून आणि खेळाडू म्हणून राहुल द्रविड सारखेच आहेत. त्यांच्यामध्ये जितके धैर्य आहे, त्यातील एक टक्का जरी मी आत्मसात करू शकलो, तर ते माझ्यासाठी खूप मोठे यश ठरेल.’ चेतन साकारियाही द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास उत्सुक आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंत पाठोपाठ ‘या’ महत्वाच्या खेळाडूलाही कोरोनाची लागण
- चहल-कुलुदीपची धमाल मस्ती, बीसीसीआयने शेअर केला मजेशीर व्हिडिओ
- रिषभ पंतची जागा सांभाळणार टीम इंडियाचा ‘हा’ प्रमुख खेळाडू
- ‘मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल’ ; भाजपचा विश्वास
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

