Share

‘महाविकासआघाडीचा भाग बनल्यानंतर शिवसेना आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध राहिला नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गोवंडी येथील उद्यानाचे नामकरण टिपू सुलतान उद्यान करण्याचा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. परंतु, या नामकरणास आक्षेप घेत भाजपने हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. तरीही समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी हा प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारार्थ पाठवला. यामुळे संतप्त भाजप सदस्यांनी गुरुवारी सभात्याग करीत अध्यक्षांना घेराव घालून निदर्शने केली. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडेही दाद मागितली.

समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दिकी यांनी पत्राद्वारे ही मागणी केली होती. यावर प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला. मात्र या नामकरणास भाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे. हा प्रस्ताव गुरुवारी बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत आला असता, या उद्यानाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने हा विषय आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठवावा, असे आदेश अध्यक्षांनी दिले. यावर उपसूचना मांडण्यासाठी वारंवार मागणी करूनही संधी न मिळाल्याने संतप्त भाजप सदस्यांनी निषेध करीत सभात्याग केला. त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात जाऊन त्यांना घेराव घातला व त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्या वेळी अध्यक्षांनी सभेतून काढता पाय घेतला. त्यामुळे भाजप सदस्यांनी महापौरांची भेट घेऊन आपली तक्रार मांडली. या नामकरणास आपला विरोध असून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजप सदस्यांनी दिला आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून शिवसेनेवर भाजपला टीका करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. भाजप खासदार मनोज कोटक यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्यावर निशाना साधताना ते म्हणाले, या आधी जेव्हा मी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुल असे ठेवले पाहिजे असा प्रस्ताव दिला होता. तेव्हा शिवसेनेच्या खासदाराने या उड्डाणपुलास सूफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज (मोइनुद्दीन सुफी चिश्ती- अजमेरी) असे नाव देण्यास सांगितले होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, आता गोवंडी परिसरातील उद्यानास ‘टिपू सुलतान’ असे नाव देण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे. यातून असे दिसून येते की शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे. महाविकासआघाडीचा भाग बनल्यानंतर शिवसेना आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध राहिला नाही आहे. यातून शिवसेनेची लाचारी स्पष्टपणे दिसून येते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!