Share

‘त्या’ आजींचा सत्कार केला पाहिजे कारण.. ; ‘मनसे’ चा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले होते. त्यात एका ८० वर्षीय आजींचाही समावेश होता. त्यांचा पुष्पा स्टाईल ‘झुकेंगे नही’ हा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला. काल (२४ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब या आजींची भेट घेण्यासाठी शिवडीमधील त्यांच्या घरी पोहोचले. मात्र यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टोला लगावला आहे.

“त्या आजींचा सत्कार केला पाहिजे. त्यांच्या निमित्ताने का होईना घराबाहेर तर पडले. धन्यवाद आजी.”, असा अप्रत्यक्ष टोला संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत लगावला आहे. दरम्यान कालच भारतरत्न ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. मात्र या सोहळयाला दांडी मारत मुख्यमंत्री शिंदे आजींच्या भेटीला पोहोचल्याने राजकारणात अनेक चर्चा रंगल्या.

“माणसाचं वय कितीही वाढलं, तरी तो मनानं तरुण हवा, असे बाळासाहेब म्हणायचे. या आजी अजूनही तरुण आहेत. वय वाढलं पण त्या अजूनही युवासेनेच्याच कार्यकर्त्या आहेत”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे आजींचे कौतुक केले. ‘मातोश्रीवर येऊन गेलात, आता वर्षावर सहकुटुंब या’,  असे निमंत्रणही मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!