Share

“कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा, पण…”, अजित पवार भडकले

Published On: 

🕒 1 min read

पुणे: तळजाई परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास (Taljai area stray dogs) वाढल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यावरच प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी म्हटले की, “इथं पाळीव कुत्री घेऊन येऊ नका, कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा. आमचं काही म्हणणं नाही. पण इथं कुत्र्यांमुळ प्रश्न निर्माण होतोय.”, असा टोला त्यांनी लगावला आहे.

“पूर्वी या परिसरात सश्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र आता ते राहिले नाही. मोरांचे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे असतं तर दोन-चार बिबटे आणून सोडले असते. एका रात्रीत कुत्री खलास झाली असती. आता इथं कुत्री आणायला बंदी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचवेळी प्राण्यांसाठी अनाथालय सुरु करतोय, त्यासाठी २२ कोटी मंजूर केले आहेत. ” असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान तळजाईवर प्रतिदिन 1 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला, यावरून नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत याला विरोध केला. यावरच अजित पवार म्हणाले की, “आपण १०० रुपयांचे पेट्रोल घालून येथे येतो. पण १ रुपया देणार नाही. पुण्यात लोक खूपच हुशार झाले आहेत. लगेच कोर्टात जातात. मात कोणत्याही गोष्टीला विरोध करण्यापूर्वी थेट कोर्टात जाण्याआधी चर्चा करायला हवी.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!