Share

कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांच्या नावे ५ लाख रुपये ठेवा; मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना देशभरात थैमान घातले आहे. अनेक लोकांचा आपला जीव या भयावह विषाणूने घेतला आहे. अनेक परिवारांचा आनंद हिरावून घेतलाय. ज्या घरात कालपर्यंत चिमुकल्यांच्या हास्याने आनंद फुलत होता आज तेच लहानगे कोरोनाने डोक्यावरील छत्र हिरावून घेतल्याने अनाथ झाले आहेत. अशा मुलांची मदत करण्यासाठी राज्य सरकार देखील तत्पर असल्याचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, ॲड यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत महिला बाल विकास विभाग करत असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी कोरोनामुळे आई-वडील दोन्ही गमावलेल्या मुलांच्या नावावर बँकेत 5 लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच ज्या मुलांचे आई किंवा वडील गेले त्यांच्या संगोपनासाठी महिन्याला 2500 रुपये देण्यात यावेत, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचविले आहे.

ठाकूर म्हणाल्या, ‘कोविड काळात दुर्दैवी असा अनाथ मुलांचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. कोविड काळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावे ५ लाख रुपये मुदत ठेव ठेवून त्यावर येणारे व्याज त्यांना मिळत रहावे. अशी मागणी यावेळी केली. एक पालक गमावलेल्या बालकांना ‘बाल संगोपन’ योजनेत समाविष्ट करत दरमहा २५००/- रुपये मदत मंजूर करावी अशी मागणी यावेळी केली. तसेच बालगृहातील मुले स्वावलंबी व्हावी याकरिता त्यांना कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षण उपलब्ध करुन द्यावे. बालगृहातील मुलांचे आपलेपणाने पालनपोषण कर्मचारी करत असतात. अशा काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यात यावा व त्यांचे लसीकरण करावे अशा विविध मागण्या यावेळी केल्या.’

महाराष्ट्र सरकारच्या बाल संगोपन योजनेद्वारे ही मदत करण्याचा प्रस्ताव ठाकूर यांनी मांडला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रस्त्वावावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

अनाथ बालकांचा शोध घ्या !

कोरोना किंवा अन्य कारणाने माता- पिता असे दोन्ही पालक बळी पडल्यामुळे अनेक मुले अनाथ झाली आहेत. या मुलांचा शोध घेणे, त्यांना मदत पोहोचवणे व त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा कृती बल (टास्क फोर्स) गठीत करण्यात आले आहेत. काही अनाथ मुले नसल्याचे कागदोपत्री जरी दिसत असले तरी वस्तुस्थिती वेगळी असणार आहे. त्यासाठी प्रयत्नपूर्वक अशा बालकांपर्यंत पोहोचावे लागेल. ग्रामविकास, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांची यामध्ये महत्त्वाची भूमिका असून महिला व बालविकास विभागासोबत समन्वयाने काम केल्यास निराधार बालकांना आपण निश्चितच दिलासा देऊ, यासाठी ठाकूर यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!