Share

महाविकास आघाडी सरकारमुळेच मराठा समाजावर अन्याय झाला – रावसाहेब दानवे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेत्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात असल्याचं सांगितलंय. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते. नंतर काही लोकांनी धोका दिल्यामुळे आमचे सरकार पडले. तीन पक्षाच्या सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा समाज मागास कसा हे जबाबदारीने मांडले नाही. या आघाडी सरकारमुळे मराठा समाजावर अन्याय झाला,’ अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांनी दिल्ली दणाणणार !

आता ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणा दिल्लीत देखील घुमणार आहे. कारण, मराठा समाजाचे प्रश्न देशासमोर मांडण्यासाठी ऑगस्ट क्रांती दिन ९ ऑगस्ट रोजी दिल्लीत पहिली गोलमेज परिषद घेणार असल्याचं शुक्रवारी संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. यावेळी, राज्यातील सर्व आमदार-खासदार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील उपस्थित राहावं यासाठी मी आमंत्रित करतोय, असं भाष्य संभाजीराजे यांनी केलं आहे. यासोबतच, मराठा समाजासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अन्यथा समाज त्यांना बरोबर धडा शिकवेल, अशी तंबीच दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!