Share

बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की, दोघे गजाआड

Published On: 

औरंंगाबाद : नाकेबंदी सुरू असताना दोन तरुणांना थांबवून फिरण्याचे कारण विचारले. तेव्हा आम्हाला अडवण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असे म्हणत त्यांनी पोलिस कर्मचा-याला धक्काबुक्की करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसाने त्यांची दुचाकी पकडल्यानंतरही ती पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यात अंमलदार मनोहर बोर्डे जखमी झाले. याप्रकरणी जलाल फारुकी अझर फारुकी (वय २१), मोहंमद वाजेद मोहम्मद शफिक (वय १९, दोघेही रा. आसेफिया कॉलनी) यांना अटक करण्यात आली.

सिटी चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे व त्यांचे सहकारी मनोहर बोर्डे हे सोमवारी दुपारी चेलीपुरा चौकात नाकाबंदी मोहिम राबवत होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास चंपा चौकाकडून दोन तरुण आले. मास्क लावलेले नसल्याने पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. परंतु त्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुस-या बाजूला मनोहर बोर्डे उभे असल्याने ते दुचाकीसमोर उभे राहिले. त्यांनी त्यांना रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न केला असता उद्धटपणे बोलून मागे बसलेल्या वाजेदने त्यांना हाताचापटाने मारहाण सुरू केली. त्यामुळे उपनिरीक्षक गांगुर्डे यांनी धाव घेत दोघांना पकडले. गांगुर्डे यांनी दोघांना नाव विचारले असता नाव सांगण्यास नकार देत, आम्हाला का थांबवले असे म्हणत दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. बोर्डे यांनी दुचाकी पकडून ठेवल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली.

दरम्यान, नाकाबंदीदरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने दुचाकीवरील दोघांची विचारपूस करत असताना एकाने तत्काळ मोबाइल काढून मित्राला कॉल लावला व पोलिसांनी आम्हाला मारले असून, पटकन सर्वांना घेऊन या, असे सांगत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस उपनिरीक्षक गांगुर्डे यांनी दोघांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!