Share

सदाभाऊ खोत यांना धक्का ; जिल्हाध्यक्षांनी केला शिवसेनेत प्रवेश

Published On: 

पुणे : रयत क्रांती संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या मराठा आरक्षण राज्यव्यापी आंदोलनास सुरवात करण्यात आली आहे. ‘मराठ्यांच्या पोरांचे आरक्षण बांधलं काठीला…महाविकास आघाडी सरकार गेलं काशीला…’ हे घोषवाक्य घेऊन राज्यभर आंदोलनास सुरवात करण्यात आली आहे. परंतु आता मात्र रयत क्रांती शेतकरी संघटनेला व संघटनेचे संस्थापक, माजी राज्यमंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांना पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्ह्याध्यक्ष माऊली आहेर यांनी संघटना सोडली असून त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या संघटनेच्या माध्यमातून आपले स्वतंत्र राजकारण करू पाहणाऱ्या खोत यांना जिल्हाध्यक्षांसारखे सहकारी सोडून जात असल्याने संघटनेला विचार करायला लावणारे आहे. रयत क्रांती शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष माउली आहेर यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीररित्या प्रवेश केला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी या कार्यकर्त्यांच्या हातात चौफुला येथे शिवबंधन बांधले.

शिवसेनेत प्रवेश करणारे रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली आहेर म्हणाले की, शिवसेनेत 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण होते; म्हणून आम्हाला शिवसेनेशी जवळीक वाटते. त्यातून आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!