Share

काँग्रेसला धक्का! महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुष्मिता देव यांचा तडकाफडकी राजीनामा

Published On: 

नवी दिल्ली : अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व पक्षाच्या माजी खासदार सुश्मिता देव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटरवरही आपल्या प्रोफाईलमध्ये काँग्रेसची माजी सदस्य असा उल्लेख केला आहे. सुश्मिता देव यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपण पक्ष सोडत असल्याचे कळवले आहे. सुष्मिता देव या टीम राहुलच्या सदस्य होत्या.

काही दिवसांपू्र्वी सुष्मिता देव यांनी जेव्हा आपले ट्विटर प्रोफाईल बदलले तेव्हाच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यानंतर आता त्यांचा राजीनामाच समोर आला आहे. सुष्मिता देव यांचंही ट्विटर अकाऊंट काँग्रेसच्या अन्य नेत्यांसह ब्लॉक झाले होते. काँग्रेसकडून त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. राहुल गांधींनीही त्यावेळी केंद्रावर निशाणा साधला होता.

सुष्मिता देव या काँग्रेसच्या माजी खासदार आहेत. सुष्मिता देव यांनी महिला काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले. काँग्रेसच्या आघाडीच्या फळीतील नेत्या अशी त्यांची ओळख आहे. सुश्मिता या गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसशी संबंधित होत्या. त्यांनी आपण पक्ष का सोडत आहोत, याचे कुठलेही कारण दिलेले नाही. सार्वजनिक जीवनात आपण नवा अध्याय सुरु करत आहोत, एवढाच उल्लेख त्यांनी केला आहे.

‘सीएए’ला दिला होता पाठिंबा
सुष्मिता देव यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबद्दल काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतली होती. तेव्हापासून त्या चर्चेत होत्या. आसाम मधील बराक खोऱ्याचे प्रतिनिधीत्व त्या करत होत्या. तेथील जनतेचा सीएएला पाठिंबा असल्याने आपणही या विधेयकाच्या बाजूने आहोत, असे देव यांनी स्पष्ट केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!