पुणे : देशातील कोरोनाचे संकट अद्याप कमी झालं नसलं तरी कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने मात्र गती घेतल्याचे दिसून येत असतानाच पुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कोरोना प्रतिबंधित लस उपलब्ध आहे, पण ती टोचणार कशी ? असा प्रश्न महापालिकेच्या आरोग्य विभागाला पडला आहे. लसीचा डोस देण्यासाठी आवश्यक सिरींजचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे कालपासून पहायला मिळत आहे.
कोरोना लसीकरण सिरींज अभावी रखडल्याचा प्रकार पुण्यात घडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसने आज चांगलीच आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कोरोना लसी उपलब्ध होऊन केवळ सिरींज अभावी लसीकरण रखडणं ही पालिकेचा भोंगळ कारभार दाखवणारी घटना आहे. तसेच राज्यातील मोठ्या महानगरपालिकांपैकी एक महापालिका असणाऱ्या अ दर्जाच्या पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसावी यापेक्षा दुर्दैव काय असावं ? असा घणाघात जगताप यांनी महानगरपालिकेवर केला.
दरम्यान यावर आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. ‘लसीकरण सुरु झाल्यापासून डोससोबत सुईचाही पुरवठा होत होता. मात्र राज्य सरकारकडून पूर्वसूचनेशिवायच सुईचा पुरवठा बंद झाला. शिवाय ही सुई खुल्या बाजारात उपलब्ध नाही. त्याचा परिणाम स्वाभाविकपणे लसीकरणावर झाला. तातडीने १ लाख पर्यायी सुई खरेदी केल्यात, उद्यापासून लसीकरण सुरु होत आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महापालिकेने दोन्ही लाटांचा आजवर सक्षमपणे सामना करत सर्व यंत्रणा उभ्या केल्या, हे पुणेकर जाणतात. त्यामुळे ‘दीड रुपयांची सुई घ्यायलाही पालिका महाग’ या बातमीवर पुणेकर विश्वास ठेवणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. बाकी पुणेकर तर सुज्ञ आहेतच’ असे ट्वीट मोहोळ यांनी केले आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महापालिकेने दोन्ही लाटांचा आजवर सक्षमपणे सामना करत सर्व यंत्रणा उभ्या केल्या, हे पुणेकर जाणतात. त्यामुळे 'दीड रुपयांची सुई घ्यायलाही पालिका महाग' या बातमीवर पुणेकर विश्वास ठेवणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
बाकी पुणेकर तर सुज्ञ आहेतच !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 30, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भुजबळ कुणाला धमकी देत नाहीत, तर…’; शिवसेना आमदाराच्या आरोपांवर भुजबळ यांची प्रतिक्रिया
- भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या भुजबळांकडे २५ वर्षात २५ हजार कोटी कसे आले? आ. कांदेंचा सवाल
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- पूरस्थितीला इसापूर धरण प्राधिकरणाचा हलगर्जीपणा जबाबदार; भाजपचा आरोप
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

