नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत असतानाच काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदासाठीचं नवं नाव जाहीर केले आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे विधीमंडळ गटनेते म्हणूनही निवड करण्यात आल्याचं हरीश रावत यांनी जाहीर केलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी ट्विट करून चरणजीतसिंग चन्नी मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केले होते. यासह, पंजाबमध्ये आता दोन उपमुख्यमंत्रीदेखील केले जातील. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. यावेळी ते बोलताना ते म्हणाले कि, पंजाबमध्ये दोन उपमुख्यमंत्रीही बनवावे अशी अनेक नेत्यांची इच्छा होती.
त्यांच्या इच्छेनुसार, आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील. पण, अद्याप या दोन्ही नावांवर चर्चा झालेली नाही. सर्वात आधी सोमवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री शपथ घेतील, त्यानंतर कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय घेतला जाईल. चरणजीत सिंग चन्नींच्या नावावर पक्षातील प्रत्येकजण सहमत आहे. चरणजीत सिंग चन्नी यांचे नाव नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समतीनेच ठरवण्यात आल्याचं ते म्हणाले. याशिवाय, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना भेटायला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हायवोल्टेज ड्रामा संपला;अखेर किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे रवाना
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- अफगाणिस्तानमध्ये भारतीय गुंतवणूक सुरु राहणार?; गडकरींनी दिले उत्तर
- काँग्रेसचे धक्कातंत्र; चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
- ‘लगे रहो किरीटजी, इनकी बजाते रहो’; नितेश राणे यांचे खोचक ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
