Share

हायवोल्टेज ड्रामा संपला;अखेर किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे रवाना

Published On: 

मुंबई : माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली आहे. किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याआधी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सोमय्या यांच्यावर आज दुपारी मुंबई पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली होती. त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सोमय्या यांना घराबाहेर जाऊ देण्यात आले आहे.

दरम्यान, सोमय्या हे गिरगाव चौपाटीवर दाखल झाले असून तिथे गणेश विसर्जनाला हजेरी लावून ते लगेचच महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरसाठी रवाना होणार होते. परंतु सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी सीएसएमटीवर अडवले होते. सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे जाण्यावर ठाम होते.

कोणत्याही पोलीसांना व त्यांच्या बळाला न घाबरता सोमय्या अखेर ८ वाजून १४ मिनिटांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसले. आणि आता महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले आहेत.  तर दुसरीकडे दूरध्वनीच्या माध्यमातून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यात चर्चा सुरु आहे.  दरम्यान, सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करणारा आदेश जारी करण्यात आलेला असल्याने संघर्षाचा पुढचा अंक कोल्हापुरात रंगण्याची चिन्हे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!