Share

मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला अटक…

Published On: 

जालंधर : पैश्यांची अफरातफर प्रकरणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा पुतण्या भुपिंदरसिंह हनी याला अंमलबजावणी संचलनालयने ED काल संध्याकाळी (गुरुवारी) अटक केली आहे. पैश्यांची अफरातफर आणि वाळू तस्करी हे आरोप त्यांच्यावर ठेवले आहेत. अंमलबजावणी संचलनालयने जालंधर येथील कार्यालयात त्यांची कसून चौकशी केली.

Prevention of Money Laundering Act (PMLA) कायद्यांतर्गत त्यांना अटक केली गेली आहे. २० दिवसांपूर्वी ED ने १० कोटी रुपये रोख रक्कम, २१ लाख किमतीचे सोने आणि १२ लाख रुपये किमतीची रॉलेक्स घड्याळे एवढा ऐवज भुपिंदरसिंह हनी यांच्या रहात्या घरातून त्यांनी हस्तगत केला होता. याच पार्श्वभूमीवर त्यांना अटक केली गेली आहे.

भुपिंदरसिंह हनी यांच्या कार्यालय, रहाते घर आणि इतर अनेक ठिकाणी छापे टाकत संचलनालयाने ही कारवाई केली. मोहाली, लुधियाना, रुपानगर, फतेहगर साहिब आणि पठनकोट इत्यादी ठिकाणी ED ने छापे मारले. भुपिंदरसिंह हनी यांच्या बरोबर इतर २६ जणांवर कारवाई करत ED ने त्यांच्या ठिकाणांवर देखील छापेमरी केली.

यावर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चानी यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, विरोधी पक्षाकडून मला, माझ्या मंत्र्यांना आणि कॉँग्रेस सरकारला लक्ष करण्याचे हे प्रकरण अपेक्षित नव्हते. पंतप्रधान यांच्या पंजाब दौऱ्यात घडलेल्या सुरक्षेच्या प्रश्नाचा हा ED कडून बदला घेतला गेला असल्याचा आरोप त्यांनी ED वर केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!