दुबई- धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनच्या दमदार शतकाच्या जोरावर दिल्लीच्या संघाने 164 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना निकोलस पूरनच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर पंजाबने 5 गडी आणि 6 चेंडू राखून सामना जिंकला. या विजयामुळे पंजाबच्या संघाने 8 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.
धवनने 57 चेंडूत शतकी कामगिरी केली. 61 चेंडूत 106 धावांवर धवन नाबाद राहिला. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकार लगावले. धवनने या खेळीसह आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा धवन जगातला पाचवा आणि चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.
या विजयासह त्यांनी २ गुणांचा फायदा घेत गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर उडी घेतली. तसेच दिल्ली पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दरम्यान, दिल्लीला पराभव स्विकारावा लागला असला तरी या सामन्यात शतक करणारा दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
A look at the Points Table after Match 38 of #Dream11IPL pic.twitter.com/SYfSXoIumI
— IndianPremierLeague (@IPL) October 20, 2020
मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर मंगळवारी पंजाबनं अव्वल स्थानी असलेल्या दिल्लीला 5 विकेटनं पराभूत केले. यासह पंजाबचा संघ थेट पाचव्या क्रमांकावर आला आहे. पंजाब संघाचे आता 8 गुण झाले आहेत. पंजाबने 10 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत, तर 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर दिल्ली मात्र पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दिल्लीने 10 पैकी 7 सामने जिंकले असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री उस्मानाबाद दौऱ्यावर,बळीराजाला मोठ्या अपेक्षा
- एमआयएम-वंचितला खिंडार,असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश
- पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील
- कुणी कांदा साठा तपासायला सरकारी अधिकारी आला तर त्याला दांडक्याने सोलून काढा – सदाभाऊ खोत
- मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ? ; फडणवीस उत्तर द्या : अमोल मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

