🕒 1 min read
औरंंगाबाद : तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याकडे वाईट नजरेने एकटक बघणाऱ्या ३७ वर्षीय आरोपीला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी (दि.५) सुनावली. दामोदर कन्हैय्या राबडा (रा.सिडको, एन-७), असे दोषीचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी ही ४ मे २०१७ रोजी व्यंकटेशनगर येथील घरातून समोरील बागेत सायकल खेळण्यास गेली होती. मागील २०-२५ दिवसांपासून पाठलाग करणारा दामोदर हा पीडितेकडे बाहेर उभा राहून वाईट नजरेने एकटक पाहात होता. शालेय साहित्य आणण्यासाठी फिर्यादी जात असतानाही पाठलाग करायचा. एके दिवशी मामाच्या घरी जात असतानाही आरोपी मागे आला व बाहेर उभा राहून एकटक पाहात होता. त्याबाबतची माहिती मामाला दिली. मामाने व इतरांनी मिळून आरोपीला पकडून जिन्सी पोलीस ठाण्यात नेले. तेथे तक्रारीवरून दामोदरविरुद्ध भादंवि कलम ३५४ व पोक्सो कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी विशेष सरकारी वकील ज्ञानेश्वरी नागुला (डोली) यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्याआधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. यामध्ये फिर्यादीची व घटनेतील प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची ठरली.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनात सरकारची डोकेदुखी ठरत असलेल्या ट्विटरवर भारत सरकार बंदी घालणार ?
- पदोन्नतीसाठी देखील आरक्षणाची तरतूद करा; रामदास आठवलेंची राज्यसभेत मागणी
- बागवे व जोशींची नियुक्ती ‘पुणे कॉंग्रेस’ची मरगळ दूर करणार का?
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- एका वर्षात स्मार्ट सिटीने ४३८ कोटीचे प्रकल्प पूर्ण केले- प्रशासक पांडेय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
