औरंगाबाद : मागील एक वर्षात स्मार्ट सिटी अंतर्गत एकूण ४३८ कोटी किमतीचे प्रकल्प ज्यात १५२ कोटीचे रस्ते, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन, क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे, पाणी पुरवठा योजना, स्मार्ट शहर बस, बस थांबे, बस डेपो, ई-गव्हर्नन्स, ऐतिहासिक दरवाजे, दमडी महल, नहर-ए-अंबरी आणि शहागंज घडीचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण या प्रकल्पांबद्दल महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी आज (दि.५) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत औरंगाबाद महानगपालिकेने राबवलेल्या विविध प्रकल्पांची माहिती प्रशासकांनी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनने मुख्यमंत्र्यांना दिली. जानेवारी २०२० मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत फक्त ३ प्रकल्प पूर्ण होते, जानेवारी 2021 पर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत एकूण ४३८ कोटी किमतीचे प्रकल्प पूर्ण करण्यात आल्याचे पांडेय यांनी सांगितले.
घनकचरा व्यवस्थापन या विषयावर बोलताना प्रशासक म्हणाले की स्वच्छ भारत सर्वेक्षनाचे नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात औरंगाबाद पालिकेस ओडीएफ++ मानांकन मिळाले आहे. शहरातील ३ कचरा प्रक्रिया प्रकल्प पाडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी कार्यनिवित झाले असून चौथे हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्राचे काम येत्या चार महिन्यात पूर्ण होईल.
जलकुंभाच्या कामाची पाहणी
बैठकीच्या आधी मुख्यमंत्री यांनी नवीन पाणी पुरवठा योजने अंतर्गत महानगरपालिका आयुक्त बंगल्याजवळ सुरू असलेल्या जलकुंभाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना योजनेबाबत माहिती देण्यात आली. तद्नंतर याठिकाणी मुख्यमंत्री यांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- संतांचे केवळ दर्शन पुरेसे नाही, त्यांचे विचारही जगावेत-पंकजा मुंडे
- औरंगाबाद पालिकेला मिळाले ‘ओडीएफ ++’ मानांकन
- अवघ्या दीड तासांत संपला मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा, कोणतीही नवीन घोषणा नाही
- मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी केवळ 1.45 टक्के निधी
- ‘मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की होतेय’


