पुणे : पुणे शहरात मे महिन्याच्या मध्यानंतर दुसऱ्या कोरोना लाटेतील रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु झाली. एप्रिल-मे महिन्यात दिवसाला ७-८ हजारांच्या घरात रुग्णांची संख्या गेलेली होती. ही रुग्णसंख्या आता शेकड्याच्या घरात आली असली तरी नव्या बाधितांची संख्या गेले काही दिवस वाढत आहे. काल (दि. ५ जुलै) रोजी नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली होती. मात्र, आज पुन्हा एकदा नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.
कोरोनामुक्ताच्या संख्येपेक्षाही नव्या कोरोना रुग्णांची संख्या हि अधिक असल्याने पुन्हा एकदा सक्रिय रुग्णांची संख्या हि २७०० च्या वर गेली आहे. अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आज (दि. ०६ जुलै) रोजी पुणे शहरात तब्बल २६८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८० हजार १५० इतकी झाली आहे. शहरातील २६६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६८ हजार ८१२ झाली आहे.
तर, पुणे शहरात सध्या २ हजार ७१६ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २८४ रुग्ण गंभीर तर ४५० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंडे, महाजन असते तर त्यांनी भाजपच्या १२ आमदारांच्या थोबाडीत मारली असती – पवार
- ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंची फडणवीसांवर खोचक टीका
- ‘कालचा प्रकार पाहून मी अवाक् झालो, शरमेने मान खाली गेली’
- बाप रे ! पत्रकारांच्या स्वातंत्र्यांवर गदा आणणाऱ्या नेत्यांच्या यादीत मोदींचे नाव
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य


