🕒 1 min read
पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष चांगलाच पेटला आहे. याचे पडसाद स्थानिक पातळीवर देखील पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा खासकरून उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने झेंडा फडकावला. आता पालकमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाल्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा संघर्ष पुन्हा पाहायला मिळतोय.
दरम्यान, पुणे महापालिका निवडणूक पुढील वर्षी असून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच, आज पुण्याच्या समस्यांबाबत, प्रश्नांबाबत मंत्रालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाच आमंत्रण न देता डावलण्यात आलं आहे. यामुळे मोहोळ यांनी ट्विटरद्वारे जाहीर नाराजी व्यक्त करतानाच पुणेकर हे लक्षात ठेवतील, असा इशारा देखील दिला आहे.
‘महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे. कोरोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही. उलट मी कोरोनाबाधित असल्याचा काळ वगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेऊन पुढे जात राहिलो. मात्र या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करुन न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील. कारण पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत,’ असं महापौर मोहोळ म्हणाले आहेत.
उलट मी कोरोनाबाधित असल्याचा काळ वगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेऊन पुढे जात राहिलो. मात्र या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करुन न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील. कारण पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 29, 2021
यासोबतच, ‘गेल्या चार वर्षांत झालेली पुणे शहरात झालेली विकासाची कामे आणि सुरु असलेल्या मोठ्या प्रकल्पाची माहिती समस्त पुणेकरांना आहे. मात्र आपल्याला डावलून का होईना पण शहराच्या प्रश्नांसंदर्भात बैठक होतेय, याचं स्वागतच !,’ असा उपरोधिक टोला देखील मोहोळ यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO
- आयपीएलमध्ये परदेशी खेळाडू खेळवण्यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न
- ‘माझं वय ७२ वर्ष, आजही चौकशीला हजर राहू शकत नाही’; अनिल देशमुखांच ईडीला पत्र
- ‘वडेट्टीवार बोगस, फंटूस आणि फडतूस माणूस… आता त्यांनी बीडमध्ये येऊन दाखवावं’
- ‘…तरच अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहणार’; देशमुखांच्या वकिलाने सांगितली अट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
