🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याप्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. या तपासात ईडीच्या हातात अनेक पुरावे लागत आहेत. ईडीने मुंबईत काही बार मालकांची चौकशी केली असता देशमुखांना ४ कोटींचा हप्ता दिल्याची कबुली जबाब त्यांच्याकडून नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान आता निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरुन डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये मुंबईच्या काही पब्स, बारच्या मालकांकडून चार कोटीहून अधिक वसुली केली. ईडीच्या म्हणण्यानुसार वाझेने देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना हे पैसे दिले, असा खुलासा या मालकांनी ईडीकडे केला आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडी अधिक आक्रमक होत असून त्यांचे स्वीय सहाय्यक हे सध्या ईडी कोठडीत आहेत.
ईडीने अनिल देशमुख यांना दुसऱ्यांदा समन्स बजावून आज (दि. २९ जून) रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. ईडीकडे असलेले पुरावे आणि इतर माहिती यावरून ईडी आज काय कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं. मात्र, अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास असमर्थता दर्शवली असून त्यांनी ईडीला याबाबत पत्र देखील लिहिलं आहे.
अनिल देशमुख यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय ?
‘ईडीने 25 जूनला समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईसीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रं मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे. आजही (29 जून) मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय 72 वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी जबाब नोंदवेन. मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी,’ अशी मागणी देखील देशमुखांनी केली आहे. तत्यामुळे ईडी आता काय पाऊल उचलणार हे महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘वडेट्टीवार बोगस, फंटूस आणि फडतूस माणूस… आता त्यांनी बीडमध्ये येऊन दाखवावं’
- ‘तिच्यामुळे माझं आयुष्य आणखी सुंदर बनलंय’ ; अर्जुनने मलायकासाठी लिहिली भावूक पोस्ट
- १ जुलैपासून ‘या’ बँकेतील ग्राहकांना जाणून घ्यावा लागेल नवीन IFSC Code
- ‘वडेट्टीवार बोगस, फंटूस आणि फडतूस माणूस… आता त्यांनी बीडमध्ये येऊन दाखवावं’
- ‘गर्व आहे मला भक्त असल्याचा’ अमृता फडणवीस याचं ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
