Share

‘…तरच अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहणार’; देशमुखांच्या वकिलाने सांगितली अट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुसऱ्यांदा समन्स बजावून आज (दि. २९ जून) रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. ईडीकडे असलेले पुरावे आणि इतर माहिती यावरून ईडी आज काय कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं. मात्र, अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास असमर्थता दर्शवली असून त्यांनी ईडीला याबाबत पत्र देखील लिहिलं आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर वकिलांची खलबतं सुरु असल्याची माहिती मिळत आहे. अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘काही कागदपत्रे घेऊन यायची आहेत. हे ईडीने सांगितले नाही. आता मी ईडी कार्यालयात जाऊन काय कागदपत्रं मागितली आहेत. कागदपत्रे मिळाल्यानंतर अनिल देशमुख आज ईडी समोर जाण्याची शक्यता आहे. मात्र अनिल देशमुखांकडून ईडीला जे पत्र देण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते प्रत्यक्षात चौकशीला हजर राहू शकत नाही. तर व्हिडीओच्या माध्यमातून ते चौकशीला हजर राहतील. मात्र त्याआधी ईडीने संबंधित प्रश्नांची यादी आणि त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे दाखवावी.’

अनिल देशमुख यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय ?

‘आजही मी स्वत: चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्षे आहे. आजारपण आणि करोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाइन घ्यावा. ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यास मी कधीही तयार आहे. मात्र, त्याआधी ईडीनं ईसीआर (Enforcement Case Information Report) व प्रश्नांची कॉपी पाठवावी,’ असं देशमुख यांनी पत्रात म्हटलं आहे. ‘माझ्या वतीनं ईडीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी अधिकृत प्रतिनिधी नेमला आहे,’ असंही सांगतानाच ‘माझ्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत,’ याचा पुनरुच्चारही देशमुखांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!