Share

आयपीएलमध्ये परदेशी खेळाडू खेळवण्यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली. यानंतर महिन्याभरात बीसीसीआयने या स्पर्धेच्या उर्वरित हंगामाची घोषणा केली. मात्र याच कालावधीत अनेक आंतरराष्ट्रीय संघाचे वेळापत्रक व्यस्त असल्याने विदेशी खेळाडु आयपीएलमध्ये खेळु शकणार नाहीत.

यादरम्यान आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेची पुर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्यातुन अनेक प्रमुख खेळाडुंनी आयपीएलमुळे माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आता बीसीसीआयने परदेशी खेळाडूंना खेळवण्यासाठी कंबर कसली आहे.

आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांत परदेशी खेळाडू खेळावे यासाठी बीसीसीआय सर्व क्रिकेट बोर्डांशी संपर्क साधत आहे. प्रसिद्ध वृत्त वहिनीला दिलेल्या माहितीनुसार, ‘बीसीसीआयला दरवर्षी खेळणारे सर्व परदेशी खेळाडू यंदाही खेळावे असे वाटत असल्याने त्या दृष्टीने बीसीसीआय सर्व प्रयत्न करत आहे. त्यासाठी बीसीसीआय इतर क्रिकेट बोर्डाना आणि क्रिकेटपटूंना संपूर्ण सुरक्षा आणि काळजी घेतली जाईल असा विश्वास देण्याच्या प्रयत्नात आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!