Share

‘या’ अभिनेत्रीने केले कॅप्टन अमेरिकाला प्रपोज; पोस्ट व्हायरल

Published On: 

मुंबई : मार्वल सुपरहिरोच्या ‘अव्हेंजर्स’ या चित्रपटात कॅप्टन अमेरिका या सुपरहिरोचे पात्र साकारणारा अभिनेता ख्रिस इव्हन्स हा जगभरात लोकप्रीय आहे. भारतातही ख्रिसचे चाहते खुप आहेत. अव्हेंजर मालिकेतील त्याचे सर्व चित्रपट भारतीय बॉक्स ऑफीसवर तुफान चालले.

यादरम्यान ख्रिस इव्हन्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी चॅटर्जी. राणी ही ख्रिस इव्हन्सची खुप मोठी चाहती आहे. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. याव्हिडीओत राणी आणि ख्रिस इव्हन्स आहेत. याव्हिडीओला कॅप्शन देत राणीने त्याला ‘आय लव्ह यु’ म्हणले आहे.

https://www.instagram.com/p/CRAmAilgjYz/

राणीची ही पोस्ट सोशल मीडीयीवर चांगलीच व्हायरल झाली आहे. राणी ही भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रीय अभिनेत्री आहे. सोशल मीडीयावर ती नेहमी ग्लॅमरस फोटोद्वारे चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. ससुरा बडा पैसैवाला या चित्रपटाद्वारे तिने चित्रपट कारकिर्दीची सुरवात केली होती. ‘दामाद जी’, ‘फुल बने अंगार’, ‘रानी नंबर ७८६’, ‘रावडी रानी’, ‘घरवाली बाहरवाली’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!