मुंबई : बॉलीवुडचे पहिले सुपरस्टार आणि जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. आज ७ जुलै रोजी सकाळी ७.३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांचे वय ९८ होते. गेल्या काही दिवसापासुन दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यामुळे उपचारासाठी त्यांना २९ जुन रोजी मुंबई येथील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज ७ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
दिलीप कुमार यांच्या जाण्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच बड्या बॉलीवूड कलाकारांनी देखील शोक व्यक्त केला.
दरम्यान काही वेळापूर्वी दिलीप कुमार यांना मुंबईतील जुहू येथील कब्रिस्तानमध्ये सुपुर्द-ए-खाक करण्यात आले. त्या कब्रस्तानमध्ये त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलीप कुमार यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बरेच सेलिब्रेटी गेले होते. तर पाणावलेल्या डोळ्यांनी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांना अखेरचा निरोप दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपने ईडी आणि सीबीआयला कामाला ठेवलंय, सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जातील’
- मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ ; प्रकाश जावडेकरांनी सुद्धा दिला राजीनामा
- भाजपमध्ये पक्ष सदस्य होण्यापूर्वी आयारामांना मंत्रीपदाची संधी? चाकणकरांची टीका
- अखेर विद्यापीठातील बीकॉमच्या विद्यार्थ्यांना मिळणार न्याय, दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश!
- कृपाशंकर सिंह कोण आहेत ? त्यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी खरंच लाभदायक ठरेल का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

